Ad will apear here
Next
‘आयओटी’च्या माध्यमातून विश्वासार्ह, स्वस्त आणि कार्बनमुक्त ऊर्जेकडे वाटचाल


‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’
अर्थात ‘आयओटी’च्या माध्यमातून ऊर्जाव्यवस्थापनात नेमकेपणा आणता येऊ शकतो. त्यामुळे विश्वासार्ह, स्वस्त आणि कार्बनमुक्त ऊर्जेकडे वाटचाल करता येऊ शकते. ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदरात आज त्याविषयी...
............
आम्ही स्मार्टफोन, स्मार्ट शहरे आणि स्मार्ट एनर्जीच्या जगात राहतो? खरेच का? आपला ऊर्जेचा वापर अधिक कार्यक्षम होत चालला आहे का? मला वाटते, की स्मार्ट ऊर्जा प्रणालीसाठी म्हणजेच ऊर्जा प्रणाली अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या प्रश्नाचे उत्तर देणे आवश्यक आहे.

प्रत्येक उद्योगात, प्रत्येक गॅजेटमध्ये, प्रत्येक मशीनमध्ये आणि प्रत्येक घरातील वस्तूंमध्ये अंटरनेट ऑफ थिंग्ज अर्थात ‘आयओटी’चे घटक यायला सुरुवात झाली आहे. ‘स्मार्ट’ या विशेषणाने ओळखल्या जाणाऱ्या अनेक वस्तू बाजारात यायला लागल्या आहेत. वापरकर्ते/ग्राहक आणि विविध सेवा यांच्यामध्ये जे तंत्रज्ञान परस्परसंवाद साधू शकते, ते स्मार्ट तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते

‘आयओटी’मध्ये विविध सेन्सर्सचा वापर करून माहिती संकलित केली जाते आणि माहितीच्या आधारावर लोकांना निर्णय घेणे सोपे होते. जग बदलते आहे. त्याचे रूपांतर एकमेकांशी संवाद साधू शकणाऱ्या यंत्रांमध्ये होत आहे. मग त्यामध्ये ऊर्जा आणि पर्यावरण या दोन गोष्टींना विसरून कसं चालेल!

स्मार्ट एनर्जी हा शब्द ऊर्जा उत्पादन, ऊर्जा संग्रहण, ऊर्जा हस्तांतरण, ऊर्जेचा वापर आणि नियंत्रण या संदर्भात वापरला जातो. स्मार्ट ग्रिड, स्मार्ट मीटरिंग, स्मार्ट होम आणि स्मार्ट सिटी या संज्ञाही त्याच्याशीच निगडित आहेत. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जलऊर्जा आणि बायोगॅस ऊर्जा प्रकल्प यांसारखे स्थानिक ऊर्जास्रोत स्मार्ट ऊर्जेचे मुख्य घटक आहेत. 

ऊर्जा पुरवठा आणि मागणी यांमधला फरक, प्रचंड प्रमाणावर येणारा खर्च, वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेज कमी-जास्त होणे, वीजप्रवाहातील दोष शोधणे, वितरणात होणारे नुकसान आणि चोरी, पर्यावरण आणि तापमान व्यवस्थापन, कार्बन फूटप्रिंट या आणि अशा अनेक समस्यांवर स्मार्ट ऊर्जा यंत्रणेचा वापर हा उत्तम उपाय आहे.

आजच्या काळात ऊर्जा बचत हे एक मुख्य आव्हान आहे. ऊर्जा बचत तेव्हाच करता येईल, जेव्हा ऊर्जेचा वापर किती, कसा आणि केव्हा होतोय हे कळेल. पुढील विविध यंत्रणांचा वापर करून या समस्यांवर उपाय शोधणे सोपे होऊ शकते. ऊर्जा संग्रह यंत्रणा, स्मार्ट मीटर, रिमोट कंट्रोल आणि क्लाउड सर्व्हिसेस, प्रकाश तीव्रता, तापमान, आर्द्रता इत्यादींमधील बदल टिपणारे विविध सेन्सर, प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावधानतेचा इशारा देण्यासाठीची व्यवस्था, इत्यादी.

एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम अर्थात ऊर्जा व्यवस्थापन यंत्रणा ऊर्जेची मागणी पूर्ण करण्याबरोबरच खर्च कमी करण्यात योगदान देऊ शकते. इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि बिग डेटाच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा उपयोग निवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रात ऊर्जा वापराचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी केला जाऊ शकतो. ‘स्मार्ट होम्स’साठी एनर्जी मॅनेजमेंट सिस्टीम (ईएमएस) असतेच. 

अधिकाधिक साधने एकमेकांना पूरक ठरण्याच्या दृष्टीने वापर करणे आवश्यक आहे. ज्या इमारतींमध्ये धुरासाठी धोक्याची सूचना देणारे साधन, तापमान नियंत्रण करणारी यंत्रणा, सुरक्षा कॅमेरे, हालचालींवर लक्ष ठेवणारी व्यवस्था अशा विविध सेवा उपलब्ध आहेत, तिथे ऊर्जेची बचत करणे अधिक सोपे आहे. ऊर्जा हा कोणत्याही व्यवसायासाठी एक महत्त्वपूर्ण स्रोत आहे. ऊर्जेवरील खर्च वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक संस्था स्मार्ट मार्ग शोधत आहेत.

स्मार्ट ग्रिड हा ऊर्जा उद्योगाचा एक नवीन पैलू आहे. यात पारंपारिक इलेक्ट्रिक नेटवर्कमधील समस्या सोडवण्यासाठी विविध प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. स्मार्ट ग्रिडमुळे नवी क्रांती होण्याची अपेक्षा आहे. स्मार्ट ऊर्जा यंत्रणेचा वापर स्मार्ट घरे, स्मार्ट सिटी, औद्योगिक आयओटी, स्मार्ट रिटेल, उद्योगधंदे आणि कारखान्यांत करता येईल. स्मार्ट एनर्जी तंत्रज्ञान मुख्यत: ऊर्जेच्या काटेकोर वापरासाठी उपयुक्त आहे.

स्मार्ट ऊर्जा व्यवस्थापनामुळे होणारे काही फायदे :
- ऊर्जेच्या वापराबाबत नेमकी माहिती मिळू शकते. त्यामुळे त्याआधारे ऊर्जावापराच्या सवयींमध्ये आवश्यक ते बदल करून वीजबचत करता येईल आणि बिल कमी होऊ शकेल.
- वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकेल आणि नियमित वीजपुरवठा होऊ शकेल.
- सोपे आणि अधिक कार्यक्षम व्यवस्थापन करता येईल.
- कार्बन फूटप्रिंटचे (प्रदूषणाचे) प्रमाण कमी होईल.
- अपघात टाळणे सहज शक्य होईल.

नवीन तंत्रज्ञानामुळे येणारी नवीन आव्हानेही आहेत. सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरण्यासाठीची गुंतवणूक करावी लागते; मात्र याचे फायदे प्रचंड आहेत. ही संकल्पना तशी नवीन असल्याने त्याविषयीची पूर्ण माहिती अजून नाही; पण ती करून घेणे अजिबातच अवघड नाही. वैयक्तिक फायदा तर होईलच आणि पर्यावरणासाठीही ते उपयुक्तच ठरेल. 

- अनुष्का शेंबेकर
ई-मेल : anushka19@gmail. com

(लेखिका माहिती-तंत्रज्ञान विषयातील इंजिनीअर असून, पुण्यातील ऑलिफाँट सोल्युशन्स या कंपनीच्या संस्थापक सीईओ आहेत. माहिती-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांत त्या १२हून अधिक वर्षे कार्यरत असून, या क्षेत्रातील नवे ट्रेंड्स हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.)

(‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ हे सदर दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/EZVPCF
Similar Posts
लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये ‘आयओटी’चा वापर लघू व मध्यम उद्योग अर्थात ‘एसएमई’मध्ये ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, यावर एक नजर... ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’च्या आजच्या भागात...
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ आणि वाहने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे ऑटोमोबाइल अर्थात वाहन क्षेत्रात मोठे बदल होऊ लागले आहेत. त्यावर एक नजर ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...
शिक्षण क्षेत्रात ‘आयओटी’चा उपयोग! शिक्षण क्षेत्रात ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’चा (आयओटी) कसा उपयोग होऊ शकतो, याविषयी पाहू या ‘इंटरनेट यत्र, तत्र, सर्वत्र’ या सदराच्या आजच्या भागात...
‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’मुळे बदलतोय आरोग्य सेवांचा चेहरामोहरा! ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ अर्थात ‘आयओटी’मुळे सर्वसाधारण आरोग्य सेवा आणि आपत्कालीन आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल होऊ लागले आहेत. त्याविषयी पाहू या ‘इंटरनेट – यत्र, तत्र, सर्वत्र’ सदराच्या आजच्या भागात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language